बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच ‘बेटी बढाओ’चा पंकजा मुंडे यांनी दिला नारा

परळी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणाऱ्या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढला, तिचे पोषण आणि शिक्षणही होत आहे, आता खरी गरज आहे तिच्या सबलीकरणाची, त्यामुळे आगामी काळात यावरच भर देण्याचे ध्येय आहे असे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे सांगितले.जिल्हाअधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभागाच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत महिला मेळावा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

याप्रसंगी पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच ‘बेटी बढाओ’ चा नारा यावेळी त्यांनी दिला. बेटी बचाव आणि बेटी पढाव हे नेमके काय आहे? तसेच याची सुरुवात का झाली तर, माझ्या परळीची चुकीच्या कारणामुळे चर्चा झाली ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी मी निर्णय घेतला आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ आंदोलन उभारले आणि त्याचबरोबर ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबवण्यास सुरुवात केली.मुलीचा जन्म नाकारण्याची जी मानसिकता होती ती या योजनेमुळे कमी झाली आहे. आज जिल्हयात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९३७ मुली एवढा झाला, ही निश्चितच भूषणावह बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...

दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितम मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, महिला आयोगाच्या सदस्या गया कराड, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, दीनदयाळ बॅकेच्या अध्यक्षा शरयू हेबाळकर, नगरसेविका उमाताई समशेट्टे, महिला बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान आदी यावेळी उपस्थित होत्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
'त्या' घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !