किल्ल्यांचे जतन आणि संरक्षण यावर भर देणे आवश्यक – अमित देशमुख

टीम महाराष्ट देशा : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या संस्कृती आहेत. या संस्कृती जपल्या जाव्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कला अकादमी स्थापन करण्यावर भर देण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा घेण्यात आला, यावेळी सांस्कृतिक संचालनालय, पु.ल.देशपांडे कला अकादमी, पुराभिलेख संचालनालय, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आणि गोरेगाव चित्रनगरीचा सविस्तर आढावा घेतला.

Loading...

ते म्हणाले, “राज्यातील अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांची पडझड होत असल्याने या गड – किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. गड किल्ल्यांची महती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचेल यावर भर देण्यात यावा. राज्यातील औसा, राजगड, नवदुर्ग, परांडा या ऐतिहासिक किल्ल्यांचे मूळ स्वरुपात जतन करताना या किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली असून याच पद्धतीने राज्यातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी न करता वास्तूंचे जतन व संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यात यावे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संचालनालयामार्फत देण्यात येणारे पुरस्कार, महोत्सव, स्पर्धा आणि शिबिरे यांचे वार्षिक वेळापत्रक पाळले जाईल यावर भर देण्यात यावा, तसेच महत्वाचे वार्षिक पुरस्कार त्याच वर्षी देण्यात येईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना देशमुख यांनी विभागाला दिल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण