‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला… राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना हटके आदरांजली

टीम महाराष्ट्र देशा- कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माजी संरक्षण जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांनी आपले संपूर्ण जीवन कामगारांच्या कल्याणासाठी घालवले. मुंबईतील एकेकाळचे बंदसम्राट म्हणून फर्नांडिस यांची ओळख होती.

दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला… अशी समर्पक भावनाही राज यांनी या व्यंगचित्रासोबत व्यक्त केली आहे. फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील असे अनेक बंद व संप देशानं पाहिले. त्यामुळं ‘बंद सम्राट’ अशी त्यांची ओळख बनली होती. तोच धागा पकडून राज यांनी फर्नांडिस यांचं व्यंगचित्र रेखाटलं आहे.

३ जून १९३० मध्ये जन्मलेले जॉर्ज फर्नांडीस यांचे तब्बल दहा भाषांवर प्रभुत्व होते. हा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. रेल्वे कामगारांनी पुकारलेल्या ८ मे १९७४ च्या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळाली.