आदरणीय अप्पा…. गोपीनाथ मुंडेंचे स्मरण करताना धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

टीम महाराष्ट्र देशा: १२/ १२ महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा जन्मदिवस, एक म्हणजे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि दुसरे स्व . गोपीनाथ मुंडे, कार्यकर्तासह संपूर्ण महाराष्ट्र दोन्ही नेत्यांवर भरभरून प्रेम करतो. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असणारे धनंजय मुंड हे आज राष्ट्रवादीमध्ये आहेत. मात्र, काकांवर असणारे त्यांचे भावनिक प्रेम आजही दिसून येते. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी स्मरण करत असताना धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे.

स्व . गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आज गोपीनाथ गडावर  त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुसरीकडे, ग्रामविकास मंत्री आणि मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या वडिलांचे स्मरण करताना भावनिक फोटो पोस्ट केला आहे.

You might also like
Comments
Loading...