“बिनव्याजी पिक कर्ज व शेतीसंबंधीत कर्जाला स्पष्टपणे मुदत वाढ द्यावी”

पुणे : सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. ह्या काळात शेती व शेतमालाशी संबंधीत सर्व व्यवहार ठप्प आहेत. ३१ मार्च रोजी देय असलेल्या कर्जाच्या EMI ला रीझर्व बॅंक अॉफ इंडीयाने मुदत ३ महिन्याची मुदत वाढ दिली आहे. परंतु यामध्ये शेतीशी संबंधीत कर्जाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ३१ मार्च रोजी देय असलेल्या बिनव्याजी पिककर्ज व शेतीसंबंधीत कर्जाला स्पष्टपणे ३ महीन्याची मुदत वाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी अकोला जिल्हाधिकारी ह्यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अार. बि. आय चे गव्हरनर शक्तिकांत दास ह्यांच्याकडे केली आहे.

सध्या संपुर्ण देश लॉकडाऊन आहे शेतमाल विकण्यासंबंधीचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. अश्या परीस्थीतीत सेवा सहकारी संस्था व बॅंकांकडुन नियमित कर्जभरणार्या शेतकर्यांना कर्जाचा हप्ता ३१ मार्च पुर्विच भरा अन्यथा तुम्ही थकित होवुन जास्तिचे व्याज द्यावे लागेल. अस्या पद्धतिने कर्जवसुली सुरु आहे.

सध्याच्या परिस्थितीत कापुस, हरभरा हि पिके शेतकर्यांच्या घरात पडुन आहेत. लॉकडाऊन मुळे बाजार समित्या बंद आहेत त्यामुळे माल विकणेसुद्धा शक्य नाही.अश्या परिस्थितीत शेतकरी इच्छा असुनही ३१ मार्च रोजी कर्ज भरणा करु शकत नाहीत. त्यामुळे, ३१ मार्च रोजी देय असलेल्या बिनव्याजी पिक कर्ज व शेती उद्योगांवर आधारीत कर्जाला ३ महीने मुदतवाढ स्पष्टपणे जाहीर करावी असी मागणी निवेदनाद्वारे प्रधानमंत्री भारत सरकार यांच्याकडे केली आहे.