fbpx

आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना देण्यात येणार सन्मानपत्र : मुख्यमंत्री फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. आज या घटनेला ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेचं राज्य शासनाकडून आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगावा लागला आहे. ते आज विविध ठिकाणी आहेत त्यांची शपथपत्रे घेण्यात येतात मात्र, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय ते मंजूर करण्यात येत नसल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.