Share

Shivsena | धनुष्यबाण कोणाला? दिल्लीत वेगवान घडामोड, निवडणूक आयोगाची तातडीची बैठक

नवी दिल्ली : दसरा मेळाव्याचा (Dussehra Melawa) निर्णय झाल्यानंतर आता धनुष्यबाण कोणाला मिळणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून वेगवान घडामोडी होत असून निवडणूक आयोगाने (Election Commision) वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन्ही बाजूने कागदपत्रे सादर करण्यात आली असून आता निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या चिन्हा बाबत अंतिम निकाल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणाला शिवसेना पक्ष अर्थात धनुष्यबाण चिन्ह मिळणार यावरुन घडामोडी सुरु असून निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतोय याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाने काल जबाब नोंदवला होता. तर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने जबाब नोंदवला आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून निवडणूक आयोगाने याबाबत त्वरित सुनावणी घेण्यास उद्धव ठाकरे यांच्या गटांनी विरोध केला आहे. ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केला आहे. याप्रकरणी एकनाथ शिंदेंनी त्वरित सुनावणी होण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करू नये अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अधिक तपशील सादर करू इच्छित असल्याने आपलं उत्तर देण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यास, नव्या चिन्हांसह लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यासाठी ठाकरेंनी टीम देखील तयार केली आहे. पहिली निवडणूक आहे, असं समजून लढायचं, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितले की, एक तर चिन्ह शिंदे गटाकडे जाईल किंवा उद्धव ठाकरे गटाकडे जाईल. दोन्ही गटाकडे चिन्ह गेले नाही तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात येणार. कुरेशी एका मुलाखतीत म्हणाले, दोन्ही गटाचे दावे तपासले जातील. तसेच प्रत्येकाची सही तपासली जाईल. दोन्ही गट आपले दावे मांडतात, या सगळ्या प्रोसेसला ४ ते ५ महिने लागतात. या दरम्यान निवडणुका झाल्या तर निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवतात आणि दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नाव आणि चिन्ह देतात.

महत्वाच्या बातम्या :

नवी दिल्ली : दसरा मेळाव्याचा (Dussehra Melawa) निर्णय झाल्यानंतर आता धनुष्यबाण कोणाला मिळणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सध्या …

पुढे वाचा

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now