‘आणीबाणी हा विषय कालबाहय़; तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे !’

आणीबाणी

नवी दिल्ली : काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती परंतु पक्षाने भारताच्या घटनात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होत. दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं होत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी हे चुकीचंच होतं. असं राहुल गांधींनी म्हटलं होत. पण सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला. आरएसएस आपली माणसं पेरुन स्वतंत्र संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. कौशिक बासु यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी हे सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. आणीबाणीवर ते सहज बोलून गेले आणि त्यावर दळण सुरू झाले, चर्चा सुरू झाली. मत आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून व्यक्त करण्यात आले आहे.

‘आणीबाणीची घटना ही चुकीची होती हे माझ्या आजीने वारंवार मान्य केले आहे, सध्याची देशातील परिस्थिती त्या वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, असे मत श्री. राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी हे सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. आणीबाणीवर ते सहज बोलून गेले आणि त्यावर दळण सुरू झाले, चर्चा सुरू झाली. 1975 साली इंदिरा गांधी यांनी एका विशिष्ट परिस्थितीत देशावर आणीबाणी लादली. त्यास एक कालखंड उलटून गेला. ज्यांचा आणीबाणीशी कधीच संबंध आला नाही अशी पिढी राजकारणात, पत्रकारितेत आहे. त्या कालखंडाचा साधा चरोटाही अंगावर उठला नाही असे लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आणि राज्याराज्यांत सत्तेवर आहेत, पण भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते.

इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे !’ असे म्हणत जणू शिवसेनेने कॉंग्रेसची पाठराखण केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP