एलफिन्स्टन ब्रिजवरच्या घटनेला सरकारच जबाबदार – अजित पवार

ajit_pawar

पिंपरी: परळ – एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ताज्या माहितीनुसार २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर २५ पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. आता या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते पिंपरीमधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला होणार आहे. त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेच्या सक्षमीकरणावर भर देणे गरजेचे आहे. रेल्वेचे सक्षमीकरण केल्यावर अशा दूर्घटना घडणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले आहेत.Loading…
Loading...