आरोग्य पद भरतीत मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करा-राजेंद्र दाते पाटील           

औरंगाबाद: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या  महाराष्ट्र शासनाच्या वतीने येत्या २८ फेब्रुवारीला आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परंतु या मध्ये  विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झालेली  आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैक्षणिक अहर्तेनुसार  विविध पदासाठी नोकरी अर्ज केलेले आहेत. परंतु शासनाच्या प्रशासकीय धोरणानुसार  समस्त मराठा एस ई बी सी विद्यार्थी वर्गाला त्यांचे पेपर देता येणार नाही, कारण या परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रा मध्ये घेतल्या जाणार आहेत.

या एकमेव कारणामुळे जर  एका विद्यार्थ्याने कितीही पदासाठी अर्ज केलेले असले तरीही त्याला इच्छा असूनही जास्तीत जास्त दोनच पेपर देता येणार आहेत. तेही एकाच जिल्ह्यात फॉर्म भरले असल्यास शक्य होईल. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तात्काळ  निवेदन पाठवून मागणी केली आहे की, विद्यार्थी वर्गाने भरलेल्या सर्व अर्जाचे प्रवेश पत्र देण्याचे निर्देश तात्काळ देण्यात  यावे. एस ई बी सी प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाने  इ डब्लू एस, १० टक्के आरक्षण हा पर्याय उपलब्द्ध करून दिलेले आहे.

आरोग्य विभागाच्या  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनेक अर्ज करूनही फक्त दोनच प्रवेश पत्र येत आहेत, परंतु उर्वरित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यानी भरलेल्या अर्जा पैकी सर्वच प्रवेश पत्र आले आहेत. ज्या विद्यार्थी वर्गाने एकापेक्षा जास्त पदांचे प्रवेश अर्ज भरलेले आहेत त्या सर्व परीक्षा घेण्याचे वेगवेगळे दिवस असावेत म्हणजे कुणीही विद्यार्थी उमेदवार आरोग्य विभागाच्या कुठल्याही परीक्षा पेपर देण्यापासुन वंचित राहणार नाही. असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना  दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या