अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शहा आणि इराणी यांना शपथ दिली.

विशेष म्हणजे स्मृती इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अमित शहा पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले . अमित शहा प्रथमच राज्यसभेवर निवडून आले आहेत. तर, इराणी यांचा हा राज्यसभा सदस्य म्हणून दुसरा कार्यकाळ असणार आहे.