#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार, अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात

नवी दिल्ली : दिल्लीतून मंगळवारी सकाळी  एक धक्कादायक वृत्त समोर आले होते. निजामुद्दीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक यात्रेमुळे अनेक नागरिक बंगलेवाली मशीदमध्ये एकत्र जमले होते. या कार्यक्रमाला जगातून अनेक मुस्लीम प्रतिनिधी एकत्र आले होते. त्यामुळे या   जमावामध्ये कोरोना वायरसचा संसर्ग होण्याची शक्यता   होती. त्यामुळे या जमावाची माहिती प्रशासनाला  मिळताच त्यांनी ही जागा  त्वरित खाली करण्याचे आदेश देण्यात  आले होते. मात्र या आदेशांचे  पालन न करता मौलाना साद यांनी  मशीद खाली करण्यास नकार दिला.

प्रशासनाच्या विनंतीला वारंवार झुगारण्यात येत असल्याने अखेर गृहमंत्री अमित शहांनी मशीद खाली करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दिली. मध्य रात्री दोन  वाजता अजित डोवाल यांनी गृहमंत्र्यांचा आदेश पाळत  मशीद खाली करण्यासाठी मौलाना साद यांची मनधरणी करून जमलेल्या सर्व जमावाची कोरोनाची चाचणी  करण्यास भाग पाडले.

अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मरकजकडून १६७ तबलिगी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. अजित डोवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. देशाचं धोरण ठरवताना अनेकदा अजित डोवाल या संघटनांशी चर्चाही करतात.

दरम्यान सध्या दिल्लीमधील हे ऑपरेशन दुसऱ्या टप्प्यात दाखल झालं आहे. सुरक्षा अधिकारी सध्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची वैद्यकीय चाचणी होईल याची काळजी घेत आहेत.या कार्यक्रमात एकूण २१६ परदेशी नागरिक उपस्थित होते. इतकंच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण ८०० नागरिक उपस्थित होते. यामधील अनेक नागरिक इंडोनेशिया, मलेशिया आणि बांगलादेशमधील आहेत.