fbpx

परवानगी नाकारल्या नंतरही प्रकाश आंबेडकरांचा मुंबईत एल्गार मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिपकडून एल्गार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. परीक्षा सुरु असल्यानं रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही रॅली काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे . दरम्यान, जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग ते आझाद मैदान अशी रॅली काढण्यात येणार आहे अस प्रकाश आंबेडकर स्पष्ट केल आहे.