राहुरी फॅक्टरी परिसरात विजेचा लपंडाव

राहुरी : राहुरी फॅक्टरी व आजुबाजुच्या खेड्यापाड्यातील वस्त्यांवर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या विजेचा लपंड़ाव सुरू आहे.मागील दोन आठवड़्यांपासुन विजेचे अचानक जाण्याने कामकाज करता न आल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उड़त आहे.

महावितरण च्या बिलामधे स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, विज शुल्क, असे विविध कर महाविरण विभागाच्या माध्यमातुन ग्राहकांना बिलामधे समाविष्ट केल्या आहे.या बिलामधे एवढ्या प्रमाणात कर समाविष्ट केला तरी विज पुर्ण दाबाने व अखंड़ीतपणे  देण्यात महावितरण संपुर्णतः अपयशी ठरताना  दिसत आहे. महावितण च्या कर्मचा-यांची ग्रामीण भागात ग्राहकांना अरेरावी असल्याने ग्राहक खुप संतप्त झाल्याचे चित्र आहे. महाविरण विज रात्रीच्या वेळेसच खंड़ीत करत असल्याने ग्रामीण भागात चो-यांचे प्रमाण खुप वाढले आहेत. धुम स्टाइलने चोरी करण्याचे प्रमाण सुध्दा जास्त प्रमाणात वाढले आहे. महाविरण च्या विरोधात राहुरी फॅक्टरी येथील काही जागृक संघटना मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

राहुरी फॅक्टरीच्या ब-याच ग्राहकांना वाढीव बिले दिले असल्याने महावितरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.कराळेवाड़ी परीसरातील ब-याच बिलांवर पाहीले असता विज मिटर किती युनिट आहे हे, अजिबात दिसत नाही. तसेच मिटरचे रिड़ींग घेणारा कर्मचारी फोटो व्यवस्थित घेत नसल्याने ग्राहकांना आपल्याला किती युनिटचे बिल येणार हे कळत नाही. महावितरणच्या कार्यालयात ग्राहक तक्रार व चौकशी करण्यास गेल्यावर ग्राहकांना व्यवस्थित माहिती सुद्धा  जात नाही.