Share

Electric Scooter | डबल बॅटरी पर्यायासह ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लवकरच होणार लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ट्रेंड वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्या आपल्या नवीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आकर्षक फीचर्ससह बाजारात लाँच करत आहे. भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी सिंपल एनर्जी देखील आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग देखील सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी आपली ही इलेक्ट्रॉनिक स्कूटर ऑक्टोबर किंवा डिसेंबर मध्ये लाँच करू शकतो. पण अद्याप कंपनीकडून अशी कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या इलेक्ट्रिक स्कूटर ची पॉवर रेंज

ही स्कूटर तिच्या वेगवेगळ्या मॉडेल्ससह बाजारामध्ये लाँच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मॉडेलची पॉवर रेंज आणि टॉप स्पीड वेगवेगळा असेल. ही स्कूटर 45km प्रतितास टॉप स्पीड आणि 236 km पर्यंत रेंज देऊ शकेल.

किंमत

अद्याप कंपनीकडून या स्कूटरच्या किमतीबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु नवीन मॉडेल ची किंमत कंपनीच्या सिंपल वन मॉडेलपेक्षा कमी असून शकते.

कंपनीच्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या येणाऱ्या नवीन स्कूटर मध्ये नवीन बॅटरी सेटअपसह काही किरकोळ बदल केले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.2kWh फिक्स्ड बॅटरीपॅक आहे. तर 1.6kWh रिमुव्हेबल बॅटरी पॅक असेल. फिक्स्ड बॅटरीपॅक हा स्कूटरच्या फुटबोर्डवर असून रिमुव्हेबल बॅटरी पॅक सीटच्या खाली दिला जाणार आहे. या स्कूटरमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे सीट खालील बॅटरीपॅक काढून तुम्ही तो घरातमध्ये चार्जिंग साठी लावू शकता.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ट्रेंड वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्या आपल्या नवीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now