परिवहन महामंडळाच्या ‘शिवाई’ या नव्या ई-बसची खासियत तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातर्फे लवकरच पुणे- नाशिक आणि पुणे- कोल्हापूर मार्गावर विजेवर चालणाऱ्या ई-बस सुरु केल्या जाणार आहेत. या बसची पुणे – मुंबई मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली असून महामंडळानं या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई आणि औरंगाबाद मार्गावरदेखील ही सेवा सुरु होणार आहे.

वातानुकूलित असणाऱ्या या बसचं शिवाई असं नामकरण करण्यात आलं आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बस सुमारे 300 किलोमीटर प्रवास करू शकते .राज्यातील एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरण पूरक करण्यासोबतच खर्च आटोक्यात आणण्यासाठी विजेवरील बस (इलेक्ट्रिक ) चालवण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला होता. त्यानुसार काही बसेस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असे सांगितले जात होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून पहिली इलेक्ट्रिक बस मुंबईत दाखल झाली आहे.

गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘शिवाई’ विद्युत बसचे उद्घाटन करण्यात आले. ही बस देशातील प्रथम आंतर शहर विद्युत बस आहे. इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर 300 किमीचा पल्ला गाठणार असून या बसच्या वापरामुळे प्रदूषणात घट होणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्य
वाहनाची आसन क्षमता 43 +1 इतकी असून त्यांना पूशबॅक स्वरुपाची आरामदायी आसने लावण्यात आली आहे.वाहनांची लांबी 12 मीटर असून रुंदी 2.6 मीटर तर उंची 3.6 मीटर इतकी आहे.वाहन चालवण्यासाठी 322 किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात आली आहे.

ही बस वातानुकुलीत असून 36 किलो वॅट क्षमतेची वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे.ही बस एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किमी चा पल्ला गाठणार आहे.बस 1 ते 5 तासांत चार्ज होणार आहे.
इलेक्ट्रीक बसच्या वापरामुळे प्रदूषणात घट होणार आहे.दरम्यान,शिवाई चालवण्यासाठी खर्च शिवशाही चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा अधिक तर शिवनेरी पेक्षा कमी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :