पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, निवडणूक आयोगाने केल्या तारखा जाहीर

evm

टीम महाराष्ट्र देशा- देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झलाा असून यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम या ४ राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Loading...

छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्पा १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होईल. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे रावत यांनी जाहीर केले आहे.या पाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकमधील शिमोगा, बेल्लारी आणि मंड्या या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून शनिवारी जाहीर करण्यात आला. या तीनही पोटनिवडणुका ३ नोव्हेंबर रोजी पार पडतील, असे रावत यांनी सांगितले.

जाहिरातीतून पप्पू शब्द वगळा निवडणूक आयोगाने भाजपला सुनावले

राजकीय भाष्य करणे हे लष्करप्रमुखाचे काम नाही- ओवेसीLoading…


Loading…

Loading...