राज्यातल्या महाविद्यालयांमधल्या निवडणुका लांबणीवर

vinod tawade sad

टीम महाराष्ट्र देशा– राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राज्यात पुराचं पाणी घरांत शिरल्यामुळे, दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यासही काल मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार होत्या. या निवडणुकांबाबत विविध विद्यापीठांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार निवडणुका सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६  मधील कलम ९९ (११) (क) मध्ये बदलाबाबतची अधिसूचना व आदेश निर्गमित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक ऑगस्ट महिन्यात आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्याचं नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आलं. मात्र, या काळामध्ये विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर ताण येणार असल्याने काही मुद्दे पोलीस आणि प्रशासनाकडून उपस्थित केले गेले.

या संदर्भात सचिवांनी मुख्य निवडणूक प्रमुखांची त्यासोबातच राज्याच्या गृहसचिवांची भेट घेतली. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत यावर निर्णय घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

राज्यातल्या पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार – अजित पवार

भीमा नदी कोपली : २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं