Share

Gujarat Election | 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये होणार निवडणुक, कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम?, जाणून घ्या

Gujarat Election | गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election) भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे आप (AAP) देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूकीचा कार्यक्रम –

अर्ज भरण्याची तारीख : 14 नोव्हेंबर
अर्ज छाननीची तारीख : 15 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर
मतदानाचा पहिला टप्पा : 1 डिसेंबर
मतदानाचा दुसरा टप्पा : 5 डिसेंबर

2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी आणि 5 किंवा 6 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकतं. निवडणूक आयोगानं यापूर्वीच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषण केली आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपला मोठं यश मिळालं होतं. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवली. पंजाबनंतर आता आप गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे आता गुजरातमधील मतदार कोणाला कौल देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Gujarat Election | गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election) भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी …

पुढे वाचा

Marathi News Politics