मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढवणार दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतही एका मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून रोज नवीन माहिती ऐकायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून रोज नवीन उमेदवारांची नावं समोर येत आहेत. आता पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट मानले जाणारे आणि खंडणी विरोधात कारवाई करून गुंडांची पळताभुई करणारे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस प्रदीप शर्मा हे देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. ते देखील भाजपकडून मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत.