fbpx

निवडणुका आल्या की शिवसेनेला प्रभू रामचंद्र आठवतात का ? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त अनेक राष्ट्रवादीचे नेते आज गुहागर मध्ये आले होते. त्यावेळी व्यासपीठावरून संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. निवडणुका आल्या की शिवसेनेला प्रभू रामचंद्र आठवतात का असा प्रश्न अजित पवार यांनी केला तर हनुमानाची आज ‘जात’ काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवाल त्यांनी भाजपालाही विचारला.

निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ? असा जहरीला सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

तसेच आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्योग सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.