निवडणुका विदेशात पण टेन्शन भारताला

Modi vs vjay gokhale

टीम महाराष्ट्र देशा : डोकलाम प्रकरण हाताळण्यात महत्वाची भूमिका बजावणारे विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला. भारताच्या शेजारी देशामध्ये पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहे त्यामुळे विजय गोखले यांचासमोर मोठे आव्हान असणार आहे.

अन्य देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने आहेत तर काही विरोधात आहे येत्या १६ महिन्यात निवडणुका होणार असून निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडे सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे विशेष ध्येय विजय गोखले यांचासमोर असणार आहे. नेपाळ मध्ये डाव्या आघाडीची सत्ता आल्यामुळे के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. के.पी.ओली चीन समर्थक असून भारत विरोधी आहेत. त्यामुळे नेपाळला चीन च्या जास्त जवळ जाण्यापासून रोखण भारतच विशेष काम असेल.

जून २०१८ मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत तसेच सप्टेंबर २०१८ मध्ये मालदीवमध्येही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भूतानमध्येही याचवर्षी संसदीय निवडणूक होणार असून भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. डोकलाम संघर्षात ते दिसून आले. सोबत बांग्लादेश मध्ये २०१८ अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे परराष्ट्रसचिव म्हणून विजय गोखले यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.