राजस्थानमध्ये कॉंग्रेस तर मध्यप्रदेशात काटे कि टक्कर

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी १०; ३० पर्यंतच्या निकालांनुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. तर मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळत आहे.

राजस्थान विधानसभेच्या ११९ जागांपैकी ९६ ठिकाणी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजप ८३ तर इतरांना १७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.

मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी १०६ ठिकाणी कॉंग्रेस ११० जागांवर भाजप तर १७ जागां अपक्ष आणि इतर पक्षांनी आघाडी घेतलेली आहे.

तेलंगाना विधानसभेत पुन्हा एकदा तेलंगाना राष्ट्र समितीला बहुमत मिळताना दिसत आहे. या ठिकाणी कॉंग्रेसने २६ जागांवर आघाडी घेतली आहे.

छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांना पाय उतार व्हावं लागणार असून येथे कॉंग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे.