सोलापूर बाजार समिती: कॉंग्रेसच्या मदतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुखांचा सुभाष देशमुखांना दणका !

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुखांचा भाजपचेच नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोर का धक्का

सोलापूर: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचेच नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोर का धक्का दिला आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी १६ जागांवर विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर केवळ दोन जागांवर सुभाष देशमुख प्रणीत पॅनलला समाधान मानावे लागणार असल्याच दिसत आहे.

बाजार समिती निवडणुकीत यंदा प्रथमच सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भाजप नेते आणि पालकमंत्री असणारे विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पक्षातील कुरघोडीचे राजकारण लपून राहिलेले नाही. याचं चित्र बाजारसमिती निवडणुकीत देखील पहायला मिळाले आहे.

सुभाष देशमुख यांना धोबीपछाड देण्यासाठी विजयकुमार देशमुख यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत आघाडी केली होती. देशमुख-माने गटाला शिवसेना, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मदत केली. त्यामुळेच सहकारमंत्र्यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

 

You might also like
Comments
Loading...