Election result: मध्यप्रदेश, छत्तीसगड राजस्थानात भाजपला झटका कॉंग्रेस बहुमताच्या जवळ

congress bjp

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधनासभा निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला असून पक्षाची सत्ता असणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राजस्थानात कॉंग्रेस बहुमताच्या जवळ पोहचली आहे.

राजस्थानमध्ये परंपरेप्रमाणे वसुंधराराजे सरकारला पायउतार व्हाव लागणार आहे. राजस्थान विधानसभेच्या ११९ जागापैकी १०० जागा मिळवत कॉंग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये देखील गेली ३ टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंह चव्हाण यांना जनतेने घरी बसण्याचा कौल दिल्याचे दिसत आहे.

मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागा पैकी ११६ जागांवर आघाडी घेत कॉंग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. याठिकाणी बसपा किंगमेकरच्या भूमिकेत असणार हे निश्चित आहे. तर भाजपला १०० जागांवर आघाडी मिळालेली आहे.

छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे.

मध्यप्रदेश

एकूण जागा १३०

कॉंग्रेस – ११६

भाजप – १०१

इतर – १३

राज्यस्थान

एकूण जागा ११९

कॉंग्रेस – ९६

भाजप – ८४

इतर – १९

छत्तीसगढ

कॉंग्रेस – ५७

भाजप – २६

इतर – ७

तेलंगाना

एकूण जागा ११९

टीआरएस – ८४

कॉंग्रेस – २६

भाजप – २

इतर -७