पालघरमध्ये खाजगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक

blank

पालघर : भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात काल पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. मात्र मतदानाच्या वेळेस अनेक ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय बनली विरोधकांनी या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान हे प्रकरण ताज असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरमध्ये मतदान झाल्यानंतर मतपेट्या वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असताना, बुथ क्रमांक 17 चिंचरे मधील मतपेट्या या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार तिथल्या नागरिकांनी उघडकीस आणलाय. त्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

बुथ क्रमांक 17 चे झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना मतदान झाल्यावर बसमधून मतपेट्या नेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पण सदर अधिकारी चिंचरे इथून खासगी वाहन क्र.एम एच ०३ ,बीएस ०९८०मधून मतपेट्या बेकायदेशीरपणे घेऊन जात होते. हे तेथील नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हा गैरप्रकार उघडकीस आणला.