बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंना जोर का झटका

Election of the President of Beed District Council

बीड – बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे बीड जिल्हापरिषदेत सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस यांच्यासह फुटून भाजपला पाठिंबा देणाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर अपक्ष जिल्हापरिषद सदस्याचे पद रद्द करण्यात आलं आहे.

दरम्यान या सदस्यांचे पद रद्द करण्यात आल्याने भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षाचे पद धोक्यात आले आहे.

पाच राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी पक्ष आदेश धुडकावत भाजपला मतदान केले होते. तर एक सदस्य मतदानावेळी गैरहजर राहिला होता. या सर्व प्रकरणावर बीड जिल्हाधिकारी यांचेकडे अपील दाखल करण्यात आले होते.  यानंतर आता जिल्हाधिकारी बीड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर एका अपक्ष जिल्हापरिषद सदस्याचे पद रद्द केले आहे.

Election of the President of Beed District Council
File Photo

काय आहे प्रकरण –
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला होता.

election-of-the-president-of-beed-district-council/