निवडणूक यंत्रणाही भ्रष्ट; निवडणूक आयुक्त पदासाठी निवडणूक घ्या !- उद्धव ठाकरे

निवडणूक यंत्रणा चालवणारा आणि निवडणूक लढवणारा पक्ष एकच!

मुंबई: पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप-शिवसेनेने एकमेकांवर आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात राजकीय तणाव वाढला आहे. दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक यंत्रणा सुद्धा भ्रष्ट असून निवडणूक आयुक्त पदासाठी निवडणूक घ्या ? अशी मागणी केली आहे. निवडणूक यंत्रणा चालवणारा आणि निवडणूक लढवणार पक्ष एकच असल्यामुळे पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला.

वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी शिवसेनेने निवडणूक लढवली. तसेच भाजपला आता मित्रांची गरज नाही. महाराष्ट्रात येऊन योगिनी शिरायांचा अपमान केला. आणि ज्यांच्यासाठी केला तोच उमेदवार विजयी झाला. त्यामुळे भाजपच्या शिवभक्तीवर संशय येतोय, असेही ते म्हणाले.

भाजपची लोकप्रियता झपाट्याने घसरली आहे. देशातील १४ पोटनिवडणूकांपैकी भाजपला फक्त २ ठिकाणी विजय मिळाला आहे. यावरून हे स्पष्ट होते.

भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.

You might also like
Comments
Loading...