डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक

Election for two seats of Management Council in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Will Take place on 12th february

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. विद्या परिषद सदस्यांतून दोन सदस्य निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कलम 30 (4) (आय) अंतर्गत विद्या परिषदेतून दोन सदस्य निवडले जातात. विद्यापीठातून या पदावर गेलेल्या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मान्यतेने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

यानुसार २२ ते ३० जानेवारीदरम्यान नामांकन दाखल करण्यात येणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी छाननी होईल. विद्या परिषदेच्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत मतदान घेण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी 12 ते 2 दरम्यान मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या