fbpx

राणेंच्या जागी कोण ? आज फैसला !

congress bjp

टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी आज (गुरुवार) पोटनिवडणूक होत आहे. नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपशी घरोबा केला खरा पण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही यावरून खरी या निवडणुकीत रंगत भरली होती. मात्र, शिवसेनेचा कडवा विरोध पाहता भाजपने ‘सेफ’ गेम खेळत प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात सरळ लढत होणार आहे.

दरम्यान, कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘अदृश्य बाण’ या निवडणुकीत करिष्मा करतील अस विधान करून आधीच रंगतदार असणाऱ्या या निवडणुकीत अजूनच रंगत भरली आहे. या पोटनिवडणुकीची आजच मतमोजणी होणार आहे. संख्याबळ पाहता प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जातोय.