fbpx

मोदींच्या केदारनाथ यात्रेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष शेवटच्या टप्यातील मतदानाकडे आणि २३ मे च्या निकालाकडे लागले आहे. प्रचारसभांच्या तोफा आता शांत झाल्याने राजकीय नेत्यांना काही दिवसांची सुट्टी मिळाली आहे. ही सुट्टी देशाच्या पंतप्रधानांनी केदारनाथ यात्रा काढली आहे. मात्र ही केदारनाथ यात्रा आचारसंहितेचा भंग करत असल्याच दिसत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाची कानउघडणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले आहे. मोदी केदारनाथला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरद्वारे पोहचले. दर्शन झाल्यानंतर मोदी संपूर्ण मंदिर परिसराचा आढावा घेणार असून, त्यानंतर ते ध्यान गुहेत जाऊन चिंतन देखील करणार आहेत. परंतु ही केदारनाथ यात्रा आचारसंहिता काळात होत असल्याने निवडणूक आयोगाने यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याचसंदर्भात निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला देशभरामध्ये अजूनही आचारसंहिता लागू आहे अशी आठवण करून दिली आहे. त्यामुळे मोदींना केदारनाथबाबाचे दर्शन महागात पडत असल्याच दिसत आहे.

दरम्यान एकीकडे मोदी केदारनाथाला भाजपला घवघवीत यश लाभो यासाठी साकडे घालत आहेत, तर दुसरीकडे विरोधक सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. अनेक भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत चर्चा सत्रांचा धडाका लावला आहे. तर चंद्राबाबू नायडू आणि के. चंद्रशेखरराव हे विखुरलेल्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

निकालापुर्वीच विरोधकांची सत्तास्थापनेची तयारी

प्रचारातून सुट्टी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या दर्शनाला