निवडणूक आयोगाची देशभरात विशेष मतदार नोंदणी मोहीम

ज्या पात्र नागरिकांनी अद्याप मतदार नोंदणी केली नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगानं देशभरात विशेष मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. आयोगानं सर्व राजकीय पक्षांना या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. जुलै महिन्यात चालणाऱ्या या मोहिमेत नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी तसंच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.