fbpx

बसपाकडे ६७० कोटींचा बँक बॅलन्स , तर भाजपकडे किती वाचा ?

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजपने मागील चार वर्षांच्या काळामध्ये जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो, मात्र प्रत्यक्षात सर्व राजकीय पक्षांचा बँक बॅलन्स पाहिल्यास मायावतींचा बहुजन समाज पक्ष सर्वाधिक श्रीमंत असल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार मायावतींच्या पक्षाकडे तब्बल ६७० कोटींचा बँक बॅलन्स आहे,

युपीमध्ये मायावतीसोबत आघाडी केलेल्या समाजवादी पार्टीकडे ४७१ कोटी रुपये आहेत. बसपा, सपा पाठोपाठ कॉंग्रेसचा क्रमांक लागतो, राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करत असलेल्या कॉंग्रेसकडे १९६ कोटींचा बॅलन्स आहे. २०१७ – १८ मध्ये सर्वाधिक म्हणजेच १ हजार २७ कोटींचा निधी मिळवणाऱ्या भाजपकडे केवळ ८२ कोटी रुपये बँक बॅलन्स शिल्लक आहे. म्हणजेच ९४५ कोटी रुपये भाजपने जाहिरात आणि पक्षाच्या इतर कामांवर खर्च केले आहेत.

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे, नायडू यांचा पक्ष तेलगु देसम पार्टीकडे १०७ कोटी रुपये आहेत. कमाई आणि बँक बॅलन्सच्या रेसमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि माकप पिछाडीवर आहेत. आप आणि माकपकडे ३ – ३ कोटी रुपये आहेत.