मुंबई – राज्यसभेच्या नाट्यमयरित्या आलेल्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कसून तयारी केली होती. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र आता काँग्रेस कडून भाजपाच्या २ आमदारांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरु होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आता निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही. यामुळे निकाल लांबण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप नोंदवण्यात आले आहे. या दोन्ही आमदारांच्या वतीने मतदानासाठी दुसऱ्या व्यक्तीला सहकार्यासाठी मतदानासाठी घेतले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते. मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. यावर निर्णय होईल असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
नियमानुसारच लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे असा टोला भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसला लगावला आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळून लावले आहे. मात्र निवडणूक आयोग अधिकार्याविरोधात कॉंग्रेस न्यायालयात जाईल, अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :