Breaking : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, देशभरात सात टप्प्यात होणार मतदान

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. मुख्य आयुक्त सुनील अरोडा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये संपूर्ण देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाणार आहे.

दरम्यान,भाजपप्रणीत एनडीए आणि कॉंग्रेस आणि भाजपविरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महागटबंधन यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. समाजवादी पार्टी आणि बसपाने वेगळी चूल मांडल्याने या निवडणुकीत रंगत आणली आहे.

Loading...

संपूर्ण देशभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. 2014 च्या तुलनेत यंदा ७ कोटी मतदार वाढले आहेत. सतराव्या लोकसभेसाठी देशात एकूण ९० कोटी मतदार असून त्यातील १.५ कोटी मतदार हे १८-१९ वर्षांचे, तर १.६० कोटी मतदार नोकरदार आहेत. यंदा प्रथमच ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमशीनचा वापर केला जाणार आहे.

‘या’ तारखांना होणार महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी निवडणूक, वाचा तुमच्याकडे मतदान कधी ?

 • पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी मतदान
 • दुसरा टप्पा १८ एप्रिल
 • तिसरा टप्पा २३ एप्रिल
 • चौथा टप्पा २९ एप्रिल
 • पाचवा टप्पा ६ मे
 • सहावा टप्पा १२ मे
 • सातवा टप्पा १९ मे
 • मतमोजणी २३ मे
 • महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये होणार मतदान
 • पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ४८  पैकी सात जागांवर मतदान
 • दुसऱ्या टप्प्यात (१८ एप्रिल) महाराष्ट्रातील ४८ पैकी १०  जागांवर मतदान

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

 • निवडणुकांच्या तयारीला लवकर सुरुवात केली : केंद्रीय निवडणूक आयोग
 • 1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदानाशी निगडीत सर्व माहिती मतदारांना मिळणार
 • निवडणुकीचं वेळापत्रक ठरवताना सीबीएसई परीक्षा, काही महत्त्वाचे सण, पेरणीचं वेळापत्रक यांचा विचार करण्यात आलाय- सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त.
 • राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे : केंद्रीय निवडणूक आयोग
 • मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात येणार
 • लोकसभेसाठी १० लाख मतदान केंद्र उभारणार
 • आजपासून आचारसंहिता लागू
 • निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिक ही आयोगाकडे थेट तक्रार करू शकणार. १०० मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.
 • निवडणूक कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर बंदी.
 • देशातील मतदार 90 कोटीच्या घरात, 2014 च्या तुलनेत सात कोटींनी वाढ
 • ईव्हीएमवर मतदाराचा फोटो असणार, सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी