संजय राऊत यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

sanjay-raut1

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सामना या वृत्तपत्राला निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील ३१ मार्चच्या रोखठोक या सदरात एक लेख होता, ज्यामध्ये ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने यावरच आक्षेप घेत ही नोटीस बजावली आहे. या नोटीशीत आचारसंहिता सुरू असताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Loading...

दरम्यान, संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सामनामधील लिखाणाबाबत मला नोटीस मिळाली असून आम्ही निवडणूक आयोगाचा पूर्ण आदर करत असून दिलेल्या वेळेत निवडणूक आयोगाला उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'