वादग्रस्त वक्तव्यनंतर उदयनिधी स्टॅलिन यांना निवडणूक आयोगाची नोटीस

द्रमुक

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

सध्या प. बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना दुसरीकडे तामिळनाडूमध्ये देखील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी एका सभेत बोलताना द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल होत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे असे धक्कादायक आरोप त्यांनी केले होते. एका वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली होती.

यानंतर या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या आधी उत्तर देण्यास सांगितलं आहे. स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर त्यांनी यावेळी मोदींना आव्हान देत ‘तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे,’ असं यावेळी ते म्हणाले होते. मात्र यांनतर या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही उत्तर दिले होते.

महत्वाच्या बातम्या