निवडणूक आयोगाने भाजपसमोर पत्करली शरणागती : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालमधील दिवसेंदिवस वाढता हिसांचार पाहता निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आणि इतर भाजप विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर निराशा व्यक्त केली जात आहे. तर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा निषेध केला असून निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा घटनाविरोधीत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. यावेळी सुरजेवाला यांनी बंगालमधील परिस्थितीबाबत भाष्य केले. सुरजेवाला म्हणाले की, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा घेतलेला निर्णय हा घटनाविरोधी आहे.

तसेच निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या सभा विचारात घेत आज रात्रीपासून निवडणूक प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे, असे देखील सुरजेवाला यावेळी म्हणाले.