भाजपाकडून आचारसंहितेचं उल्लंघन ; निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : भाजपकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे छायाचित्र आपल्या उमेदवाराच्या प्रचारात वनगा कुटुंबीयांच्या अनुमतीविना वापरल्याचा ठपका ठेवत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान, या बाबतची तक्रार वनगा यांच्या कुटुंबीयांनी आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने केली होती. जिल्ह्याच्या आचारसंहिता अंमलबजावणी समन्वयक अधिकाऱ्याने ही नोटीस बजावली असून त्याबाबत आपले म्हणणे २३ मे ला सकाळी ११ वाजता मांडण्याचा आदेश दिला आहे. हे म्हणणे स्वत: अथवा प्राधिकृत व्यक्तीमार्फत मांडावयाचे आहे. हे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे भाजपा हादरून गेली आहे.

You might also like
Comments
Loading...