एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता येणार ?

निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केली याचिका दाखल

टीम महाराष्ट्र देशा : एका उमेदवाराला एकाच जागेवरून निवडणूक लढवता यावी या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात यावी. वकिल अश्विनी उपाध्याय यांनी याच संदर्भात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

एका उमेदवाराने दोन जागांवरुन लढल्याने केवळ सरकारी तिजोरीवरच अनावश्यक ताण येत नाही तर विजेत्या उमेदवारांच्या मतदारांसोबतही अन्याय होतो. त्याचबरोबर दोन्ही जागांवर जर उमेदवार निवडणून आला तर त्याने सोडलेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीचा संपूर्ण खर्च संबंधीत उमेदवाराकडून वसूल करण्यात यावा.अस आयोगाने हे देखील म्हटल आहे.

You might also like
Comments
Loading...