चिथावणीखोर भाषणबाजी करणाऱ्या मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्माला निवडणूक आयोगाचा दणका

टीम महाराष्ट्र देशा : भडकाऊ भाषणबाजी करणाऱ्या केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगानं या बेताल नेत्यांना भाजपच्या स्टार कॅम्पेनरच्या यादीतून या दोघांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीतील निवडणुकाच्या प्रचार सभेत त्यांनी चिथावणीखोर भाषणबाजी आणि घोषणाबाजी केली होती. निवडणूक आयोगाचे सचिव पवन दिवाण यांनी जारी केलेल्या पत्रकात दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यानं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांविरोधात गर्दीसमोरच ‘देशातल्या गद्दारांना गोळ्या घाला’ अशा घोषणा द्यायला लावल्या. वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या अनुराग ठाकूर आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता भंगासंदर्भातला अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे सोपवला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'