मोदींवरील वेब सिरीजवर निवडणूक आयोगाची बंदी !

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशामध्ये निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच मतदारांना  प्रभावित करण्यासाठी जो तो पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे. परंतु त्यालाही काही सीमा आणि नियम आहेत. त्यामुळे मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘मोदी – जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ या वेब सिरीजवर देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बंदी घातली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने या वेब सेरीजचे प्रदर्शन व प्रसारण करणाऱ्या ‘इरॉस नाव’ कंपनीला नोटीस धाडले आहे.

Loading...

यापूर्वी  निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी घातली होती. देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुका सुरु असून लोकसभा निवडणुकांमध्ये कोण्या एका व्यक्तीला अथवा पक्षाला फायदा होईल असे चित्रपट निवडणुका संपेपर्यंत प्रसिद्ध केले जाऊ नयेत अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर बंदी घातली होती. पुढील सूचना देईपर्यंत वेब सिरीजचे प्रसारण करता येणार नाही, तसेच उपलब्ध असलेले ५ भाग निवडणूक आयोगाच्या पुढच्या निर्देशापर्यंत हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

 Loading…


Loading…

Loading...