शेवटच्या टप्प्यातील मतदान संपेपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाची बंदी

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला लोकसभा निवडणूक २०१९ च्या एक्झिट पोलशी संबंधित ट्विट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने १९ मे ला शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास माध्यमांना परवानगी दिली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या १९ मे ला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान माध्यमांकडून लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार या संदर्भात एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच सोशल मिडीयावर एक्झिट पोल प्रसिद्ध होत असल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

१९ मे ला सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होई पर्यंत लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल प्रसिद्ध करू नयेत. इतकेच नव्हे तर, निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला लोकसभा निवडणूक २०१९ च्या एक्झिट पोलशी संबंधित ट्विट काढून टाकण्याचे आदेशही दिले आहेत.

विशेष म्हणजे, १९ मे ला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करू शकता अशी परवानगीही निवडणूक आयोगाने माध्यमांना दिली आहे.Loading…
Loading...