fbpx

निवडणूक आयोगाकडून चिन्हवाटप जाहीर; वंचितला मिळाली ‘ही’ निशाणी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विविध पक्षांना चिन्हवाटप केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहे. आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. तसेच इतरही पक्षांना चिन्हवाटप केले आहे. यात महाराष्ट्र क्रांती सेना, हम भारतीय पार्टी, टिपू सुलतान पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी यांचा समावेश आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कप-बशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तसेच काही ठिकाणी त्यांना वेगळे चिन्ह मिळाले होते. परंतु आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तसेच संभाजी ब्रिगेड शिलाई मशीन या चिन्हाचा वापर करतील.

त्याच बरोबर महाराष्ट्र क्रांती सेना -हिरा, हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टी – किटली आणि भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन या चिन्हांचा वापर करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नवीन चिन्हासह काय कमाल करणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या