निवडणूक आयोग म्हणजे दात नसलेला वाघ: वरून गांधींचा भाजपला घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा: देशातील निवडणूक आयोगाचे काम हे , निवडणूक प्रक्रिया नियंत्रित करणे आणि निवडणुका घेणे आहे मात्र खरचं असं होत का म्हणत भाजप खासदार वरून गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करतानाचा भाजपवर देखील निशाना साधला आहे. तसेच निवडणूक आयोग म्हणजे दात नसलेला वाघ असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

अलीकडेच निवडणूक आयोग हि स्वायत संस्था असल्याच मत केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंडल होत. मात्र आज वरून गांधी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. यावेळी बोलताना वरून गांधी यांनी निवडणूक आयोगाला मर्यादित शक्ती असून गुन्हे दाखल करण्याचे देखील अधिकार नाहीत. त्यामुळे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते, असेही म्हटले आहे.