fbpx

…तर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडेंची खासदारकी होणार रद्द

टीम महाराष्ट्र देशा :  येत्या २२ तारखे पर्यंत अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे सदाशिव लोखंडे यांनी निवडणूक खर्च सादर केला नाही तर तुमची खासदारकी रद्द होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली, लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवला. विखे आणि लोखंडे यांनी निवडणुकीत केलेला संपूर्ण खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला नाही. विखे आणि लोखंडे यांनी केवळ १९ एप्रिलपर्यंतचाचं खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला. १९ एप्रिलनंतरचा खर्च त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केला नाही. इतकेच नव्हे तर सग्राम जगताप आणि भाऊसाहेब कांबळे यांनीही १९ एप्रिलपर्यंतचा खर्च सादर केला आहे. तसेच शिर्डी आणि अहमदनगर या दोन्ही मतदारसंघातील ३९ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही.

विशेष म्हणजे, अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासणीसाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. दरम्यान, खर्च सादर करण्यासाठी सर्व उमेदवारांना २२ जूनपर्यंतची मुदतवाढ निवडणूक आयोगाने दिली आहे.
२२ जून पर्यंत सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांनी निवडणुकीचा संपूर्ण खर्च सादर केला नाही तर खासदारकी गमवावी लागेल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.