निवडणुकीच्या तारखा लवकरचं जाहीर होणार, निवडणूक आयोगाने उद्या बोलावली बैठक : सूत्र  

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्याच सांगितल जात आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिला निवडणुका होतील. अर्थात अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे.या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 12 तारखेलाच ही घोषणा केली जाऊ शकते असे सूत्रांकडून कळते.

दरम्यान भाजप नेत्यांकडून याबाबतचे संकेत दिले गेले होते. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अंदाज व्यक्त केला होता.  १८ – २० सप्टेंबरला निवडणूक जाहीर होण्याची शक्यता  चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. तसेच ५ ते २० ऑक्टोबर दरम्यान मतदान पार पडेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.