fbpx

भारतीय जनतेनं फकीराची झोळी भरली; दणदणीत विजयानंतर मोदी भावनिक

टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपत आली आहे. देशात भाजप आणि मित्रपक्ष यांना या निवडणुकीत मोठ यश मिळालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली येथून भारतीय जनतेचे आभार मानले आहे.

नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना ‘भारताच्या जनतेने माझ्यासारख्या फाकीराची झोळी भरली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो’ असं भावनिक वक्तव्य केले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘हा विजय हा भारतीय जनतेचं आहे, लोकशाहीचा आहे’ असं विधान केले आहे. एनडीएतील आणि विरोधी पक्षातील विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले तसेच देशाच्या विकासासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, तुम्ही मला पुन्हा एकदा संधी डेली आहे त्यामुळे मी तुमच्या विकासासाठी कटीबद्ध आहे असंही नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले