fbpx

मोठी बातमी : गजानन किर्तीकर १५ हजार मतांनी आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर १५ हजार मतांनी आघाडीवर आहेत तर कॉंग्रेसचे उमेदवार आणि मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला हा मोठा धक्का आहे .

राज्यात मतमोजणीला सुरवात झाली आहे. भाजप २३ तर शिवसेना १९ आणि कॉंग्रेस १ जागांवर तर राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी १ जागेवर आघाडीवर आहे.

विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीभोवती केंद्रित झालेली निवडणूक, मोदी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष अशीच अखेरपर्यंत रंगली. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या काळात देशभरात सात टप्प्यात घेण्यात आलेल्या या निवडणुकीचा निकाल आज २३ मे रोजी हाती येत आहे. महाराष्ट्रात यंदा प्रथमच चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती अशी थेट लढत झाली.

देशाप्रमाणेच, महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूकही अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सध्या सगळेच राजकीय पक्ष मतदानाच्या टक्केवारीवरून जय-पराजयाचे अंदाज बांधण्यात गुंतले आहेत. मात्र राज्यात चार टप्प्यांमध्ये उसळी घेतलेला मतदानाच्या टक्केवारीचा चेंडू नक्की कोणाच्या हातात पडणार हे आज स्पष्ट होत आहे.