fbpx

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुनील मेंढेंचा दणदणीत विजय

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे अनेक ठिकाणी विजयी ठरले आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवारांचा भाजपयुतीकडून धुव्वा उडवण्यात आला आहे. तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी विजय मिळवला आहे. जवळजवळ दोन लाख मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपकडून सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना पंचबुद्धे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अखेर भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने सुनील मेंढे यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.

भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार सुनील मेंढे यांना ६३२६१९  एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पंचबुद्धे यांना४३९३१४  एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत सुनील मेंढे यांनी१९३३०५  मतांनी बाजी मारली आहे.